Latest Marathi News
Ganesh J GIF

१५०० कोटींचा काळा पैसा!

अशोक खरातची 'आर्थिक कुंडली' आता तपास यंत्रणांच्या हाती

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास आता त्याच्या आर्थिक साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची आता विशेष तपास पथकाकडून आर्थिक नाकेबंदी सुरू झाली आहे.

खरातचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणारा त्याचा चार्टर्ड अकाउंटंट आता पोलिसांच्या रडारवर आला असून, त्याच्या चौकशीतून 1500 कोटींच्या मालमत्तेचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने सामान्य लोकांना फसवून आणि लुबाडून कोट्यवधींची माया जमवली आहे. त्याची एकूण मालमत्ता 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरातच्या या अवाढव्य आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे संबंधित सीएच्या हाती होती. हा सीए केवळ खरातचेच नव्हे, तर ‘शिवनिका ट्रस्ट’च्या आजी-माजी सदस्यांचेही आर्थिक व्यवहार पाहत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एसआयटी आता या सीएकडून खरातची संपूर्ण ‘आर्थिक कुंडली’ हस्तगत करण्याच्या तयारीत आहे.या संपूर्ण प्रकरणात ‘शिवनिका ट्रस्ट’च्या आर्थिक उलाढालीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!