Latest Marathi News
Ganesh J GIF

“नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का?”; सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर थेट हल्ला

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार आहे.

अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यासाठी त्यांना समन्सही पाठवण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारेयांच्यावर देखील सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, निव्वळ हुल्डबाजी करायची म्हणून शिंदेच्या कार्यकर्त्यांनी टीका करणाऱ्या पोस्ट केल्या. पण आम्ही केसरकारांना उघडं केलं आहे. केसरकर म्हणतात मी एकटा गेलो नाही. शिंदेसाहेबांसोबत गेलो होतो. म्हणजे शिंदे आणि खरात यांचे थेट संबंध आहे, असं म्हणायचं आहे का? नामकर्ण आवारे यातील महत्वाची कडी आहे. तो भाजप आघाडीचा प्रमुख होता. जगदंब पतसंस्थेचा आवारे चेअरमन होता. खरात देखील त्या संस्थेत होता. शिवनिका ट्रस्टवर देखील आवारे होता. खरात आणि आवारे यांचे व्यावसायिक संबंध आहेत, असा आरोप त्यांनी केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!