Latest Marathi News
Ganesh J GIF

करुणा मुंडेंनी बारामतीच का निवडली? उमेदवारी अर्ज भरण्यामागचं ‘असलं’ मोठं कारण समोर

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तब्बल 55 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.त्यापैकी एक उमेदवारी अर्ज करुणा मुंडे यांचाही आहे.

त्यांनी काल 6 एप्रिल या दिवशी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही वाचण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. तसेच मुंबईमधून फॉर्म भरण्यासाठी बारामतीला आल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!