
भोंदू अशोक खरातवर ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ३० साक्षीदार तपासले असून त्यांची साक्ष महत्त्वाची ठरेल, अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

खरातशी संबंधित ४,६५० अश्लील लिंक सायबर टिमने डिलीट केल्या, तर सोशल मीडियावरील ४५० अकाउंट देखील कायमची डिलीट केली आहेत. खरातच्या मालमत्तेसंबंधी कागपदपत्रे ईडीकडे सोपविण्यात आल्याचेही सातपुते यांनी सांगितले.

खरात प्रकरणानंतर एसआयटी पथक प्रथमच माध्यमांसमोर आले. मात्र माध्यम प्रतिनिधींच्या अनेक प्रश्नांवर सातपुते यांनी मौन बाळगले. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातशी आर्थिक संबंध, लीक झालेला सीडीआर, खरातचे राजकीय कनेक्शन अशा अनेक प्रश्नांवर सातपुते यांनी उत्तर देणे टाळले. तपासाबाबत अधिक माहिती देण्यासही त्यांनी नकार दिला.


