Latest Marathi News
Ganesh J GIF

रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा ढिगारा!; पोलिसांवर ‘त्या’ नेत्यांचा दबाव

अत्याचार तसेच अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी संशयित आरोपी रवींद्र एरंडे याच्या चौकशीतून त्याने अश्लिल व्हिडीओ कुठून काढले याचा उलगडा झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे एरंडेच्या हस्तलिखित नोंदी, पीडितांशी संबंधित काही इसमांच्या नावांचे धनादेश एरंडेच्या कार्यालयात आढळून आल्याने लैंगिक अत्याचारप्रमाणेच आर्थिक व्यवहारासंदर्भातही तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांनी दिली.

संशयित एरंडेची बैंक खाती तपासली जात असून, यातून त्याचे आर्थिक कारनामे समोर येऊ शकतात. एरंडेच्या कार्यालयातून इतर काही महत्त्वाचे दस्तऐवजदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत. काही पैसे मी संबंधितांची जाहिरात करण्यासाठी घेतले होते, अशी माहिती एरंडेने पोलिसांना दिली आहे. तपासणीत सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी असे अंधश्रद्धा पसरविणारे साहित्य आढळून आल्याचे सचिन बारी यांनी न्यायालयास सांगितले होते.

संशयित एरंडेने या प्रकारातून स्वतःला वाचविण्यासाठी राजकीय कनेक्शनचा वापर करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. अहिल्यानगर येथील काही नेते दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पीडित महिलांचे जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अद्याप एकाच महिलेने एरंडेविरोधात तक्रार केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!