Latest Marathi News
Ganesh J GIF

सुनेत्रा पवारांची एक तक्रार अन् फडणवीसांनी विषय गांभीर्याने घेत दिले ‘हे’ आदेश

एकीकडे बारामतीत विधानसभेच्या पोटनिवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे. पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून एक तक्रार केली आहे. सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित विविध आरोप केले आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे महापालिकेकडून बदलण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेची तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तक्रार पुणे महापालिकेकडे पाठवली असून याबाबत खुलासा विचारला आहे. प्रभागरचनेत केलेल्या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समित्यांमध्ये कमी प्रतिनिधित्व मिळणार असल्याने ही तक्रार करण्यात आली आहे.

पुण्यात 15 क्षेत्रीय कार्यालये आहेत, या क्षेत्रीय कार्यालयांची रचना नुकतीच बदलण्यात आली आहे. त्यामुळे वडगांव शेरी आणि येरवडा भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून आल्यावर देखील त्यांच्या प्रभागातील प्रभाग समितीचे अध्यक्षपद शेजारच्या प्रभागातुन निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांना मिळाल्याच्या आरोप आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाला तातडीने हालचाली करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेचा सविस्तर वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवला आहे. फडणवीस यांनी ही तक्रार पुणे महापालिकेकडे पाठवली असून याबाबत खुलासा विचारला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!