Latest Marathi News
Ganesh J GIF

रेस्क्यू फाऊंडेशनमधून १३ तरुणींचं पलायन! १० बांगलादेशी तरुणींचाही समावेश

मोहम्मदवाडीतील ससाणे वस्ती परिसरातील रेस्क्यू फाउंडेशनमधून १० बांगलादेशी तरुणींसह १३ जणींनी थरारक पद्धतीने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडली असून, याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे.याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन तरुणी काही अंतरावरच आढळल्या असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारामुळे संस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पळून गेलेल्या सर्व तरुणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत पीडित आहेत. या तरुणींवर दिघी, फरासखाना, शिरूर, देहूरोड, जेजुरी, कोंढवा व नगर येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. या घटनेनंतर काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की, या अकरा तरुणींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे संबंधित संस्थेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संस्थेमध्ये एकूण ४२ तरुणी आहेत. त्यातील ३२ बांगलादेशी आहेत. त्यातील काहीजणींची व्हिसाची मुदत संपल्यानंतरही त्या येथे वास्तव्यास होते. यातील तीन बांगलादेशी मुलींनी संस्थेतून पलायन करण्याचा कट आखला होता. सकाळी रेक्टररुममध्ये ज्येष्ठ महिला कर्मचारी एकटीचं होती, तेव्हा तिच्या समोर कप्प्यात मुख्य गेटची चावी होती. ही संधी साधून कर्मचारी महिलेच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधण्यात आले. त्यानंतर गेट उघडून तिघींनी पलायन केले. त्या पाठोपाठ इतर मुलीही पळून गेल्या. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!