Latest Marathi News
Ganesh J GIF

रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा खळबळजनक आरोप; खरात वादाच्या भोवऱ्यात

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली.

यावेळी त्यांचा आणि मुलगा चिन्मय याचाही जबाब नोंदवण्यात आला. समता संस्थेमध्ये आपल्या नावावर असलेले खाते हे बनावट असून आपण त्यावर एक रुपयांचा व्यवहारदेखील केला नाही, त्यातील सर्व सह्या बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केला.

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे. प्रतिभा चाकणकर सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.

समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे चार खाती आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर मुलाच्या नावे दोन खाती असून, त्यातून 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. प्रतिभा चाकणकरांच्या संबंधित खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव आहे.

चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, संबंधित खाती बनावट आहेत. हे खाते मी उघडलं नाही, त्यावरच्या सह्या देखील माझ्या नाहीत. आम्ही एकही रुपयाची उलाढाल केलेली नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. तसंच, देवदर्शनाच्या नावाखाली अशोक खरातने कागदपत्रं घेतली आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा वापर करून खाती उघडली असावीत, असा आरोपही त्यांनी केला.

आम्हाला शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळाली नव्हती. मात्र माध्यमांमधून बातम्या पाहिल्यानंतर आम्ही स्वतःहून पोलिस ठाण्यात येऊन जबाब दिला, असं प्रतिभा चाकणकरांनी सांगितलं. कागदपत्रं खरी असली तरी सह्या बनावट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी सांगितलं की, ‘प्रतिभा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने समता पतसंस्थेत बनावट खाती उघडण्यात आली आहेत. त्या कधीही त्या पतसंस्थेत गेल्या नाहीत. खाते उघडताना चुकीचा पत्ताही वापरण्यात आला. सह्यांचे नमुने पोलिसांना देण्यात आले असून पुढील तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल.”

समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर चार खाती असल्याचं समोर आलं आहे. या खात्यांमधून सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. विशेष म्हणजे या खात्यांचा नॉमिनी म्हणून अशोक खरातचं नाव असल्याचंही उघड झालं आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून बनावट खाती, व्यवहारांचा स्रोत आणि त्यामागील नेटवर्क उघड करण्यावर भर दिला जातोय. येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!