
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम करतात. इंधनाचे दर कडाडले तर महागाई वंदूं आपलं बजेट डगमगू शकता. 2022 पासून देशात पेट्रोल-डीझेलचे दर स्थिर राहिले आहेत. इंधन दरात जास्त बदल झालेला नाही. पण, होर्मुज स्ट्रेट ब्लॉक झाल्यामुळे कच्च्या तेलाची पुरवठा अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे मे महिन्यात किंमती वाढू शकतात. देशभरात आज, 26 एप्रिलला, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त थोडासा बदल झाला आहे. तेल कंपन्यांनी सकाळी आपल्या दरांचे अपडेट दिले. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि डॉलर-रुपया बदलांमुळे ईंधनाचे दर काही पैसे वाढले किंवा कमी झाले आहेत. चला आजचे महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझलचे आणि CNG चे दर काय आहेत हे जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे, विशेषतः ईरान-इझरायल-अमेरिका युद्धामुळे, कच्च्या तेलाच्या दरात खूप वाढ झाली होती. $71 प्रती बॅरल ते $100+ पर्यंत दर जाऊन पोहोचला होता. आता सीजफायरनंतर तेलाच्या दरात थोडी घट झाली आहे. दक्षिण पूर्व आशियात युद्धामुळे ईंधन संकट वाढत आहे. भारत सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 13 रुपये ते 3 रुपये आणि डिझेलवरील 10 रुपये ते शून्य रुपये केली आहे.

दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रती लिटर आहे, जो कालचाही दर होता. गेल्या 10 दिवसांपासून हा दर स्थिर आहे. डिझेलचा दर आज 87.62 रुपये प्रती लिटर आहे, यातही बदल नाही. महाराष्ट्रातील मुख्य शहरातील पेट्रोल दर नवी मुंबई – ₹105.5 ठाणे – ₹103.68 पालघर – ₹103.75 पिंपरी चिंचवड – ₹105.5 पुणे – ₹103.95 नाशिक – ₹104.31 सतारा – ₹105.13 रत्नागिरी – ₹105.5 औरंगाबाद – ₹105.33धुळे – ₹104.16 महाराष्ट्रातील मुख्य शहरातील डिझेल दर अकोला – ₹90.69 अमरावती – ₹91.32 औरंगाबाद – ₹91.82 भंडारा – ₹91.4 बुलढाणा – ₹91.42 चंद्रपूर – ₹91.02 धुळे – ₹90.7 गडचिरोली – ₹91.5 गोंदिया – ₹91.86 हिंगोली – ₹91.91 महाराष्ट्रातील CNG चे आजचे दर अकोला – ₹93.03 अमरावती – ₹93.28 औरंगाबाद – ₹95.5 भंडारा – ₹86.43
बुलढाणा – ₹96.95 चंद्रपूर – ₹90 धुळे – ₹93.65 गडचिरोली – ₹90 गोंदिया – ₹86.43 हिंगोली – ₹93.03 दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्या नवीन दर जाहीर करतात. हे दर आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील किंमती, डॉलर-रुपया विनिमय दर, सरकारच्या कर धोरणे आणि डीलर मार्जिनवर अवलंबून असतात. आजच्या दिवशी पेट्रोल-डीझेलचे दर स्थिर आहेत, पण जागतिक परिस्थिती आणि सरकारच्या निर्णयांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.


