Latest Marathi News
Ganesh J GIF

सावधान! कलिंगड खाण्यापूर्वी ही बातमी वाचा: विषबाधेने कुटुंब संपल्यानंतर प्रशासनाला जाग; फ्रूट मार्केटचा मोठा निर्णय.

पायधुनी परिसरातील घाटी मोहल्ल्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाऊन मृत्यू झाल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांकडून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.कालपर्यंत हसत्या खेळत्या डोकाडिया कुटुंबाचं घर आज पूर्णपणे ओस पडलं आहे.बिर्याणीनंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, एकामागून एक मृत्यू झाले. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि घरात पूर्ण शांतता पसरली.

अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावे आहेत. कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडाचे आणि त्यांच्या शरिरातील नमुने घेतले असून, मृत्यूचे नेमके कारण तपासण्यास सुरू आहे.कलिंगड ऑनलाइन मागवले होत, असाही दावा.डोकडिया कुटुंबीयांनी खाल्लेल्या कलिंगडाबाबतही दोन दावे समोर आले आहे. त्यांनी ते ऑनलाइन मागवले होते, अशीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे. तर, ते नेहमी नळबाजार मार्केटमधूनच खरेदी करत असे आणि घरातील कलिंगड चार दिवसांपूर्वीचे असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.काही दिवस कलिंगड विक्री बंद.

कलिंगडामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताने प्रत्येकाने कलिंगडचा धसका घेतला. नळबाजार फ्रूट मार्केटसह आजूबाजूच्या बाजारातून कलिंगड गायब झाले असून बाजारात फक्त आंबेच दिसून आले. नळबाजार फ्रुट अँड व्हेजिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष अली अहमद कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांमधील भीती पाहता काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!