Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार गटात हालचाली: जय पवारांच्या विधानपरिषद प्रवेशासाठी ‘या’ नेत्याने शड्डू ठोकला; मागणीमुळे चर्चांना उधाण.

निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील मुदत संपत आहे.या रिक्त होणाऱ्या जागेवर पक्षाकडून जय पवार यांना पाठवावे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. दिवंगत अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता जय पवार यांच्यात असल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवावे असे त्यांनी म्हटले आहे.

मिटकरी यांनी समाजमाध्यमावर म्हटले की, राष्ट्रवादीच्या परिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्षाच्या वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे.सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे. कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत मात्र, अजितदादांनंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो.दादांची उणीव भरून करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादीसाठी संजीवनी ठरेल. अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा असेल, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीचे आठ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ पाहता त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.

राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी रस्सीखेच राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी पक्षात रस्सीखेच असल्याचे पहायला मिळत आहे. या जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने कुणाला संधी द्यायची यावर पक्षात चर्चा होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची सोमवारी संध्याकाळी बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे.या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत इच्छुक उमेदवार विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!