
प्रेग्नन्सी ग्लोमध्ये न्हाली दीपिका: एअरपोर्टवर दिसला दीपिका पादुकोणचा स्टायलिश अंदाज; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वीच मोठी गुडन्यूज दिली. दीपिका दुसऱ्यांदा आई होणार आहे. लेक दुआच्या जन्मानंतर दीड वर्षांनी दीपिका पुन्हा गरोदर आहे. दुसऱ्या प्रेग्नंसीतही दीपिका प्रोफेशनल कमिटमेंट्स पाळत आहे.

‘किंग’ आणि ‘राका’ या दोन सिनेमांमध्ये ती दमदार अॅक्शन सीक्वेन्स शूट करत आहे. दरम्यान दुसऱ्या प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिकाची झलक दिसली. रणवीर सिंहसोबत ती विमानतळावर दाखल झाली. तिला पाहून सर्वांचं लक्ष तिच्या बेबी बंपकडेच गेलं. तर रणवीर सिंह बायकोची काळजी घेताना दिसला. या पॉवर कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

१९ एप्रिल रोजी दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर दीपिका पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसून आली. मुंबई विमानतळावर दीपिका आणि रणवीर सिंह यांना एकत्र स्पॉट झाले. दीपिकाने लूज डेनिम शर्ट परिधान केला आहे. तरीही तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत होता. तर रणवीर सिंह तिची काळजी घेताना दिसला. यावेळी दोघंही पापाराझींना पोझ न देताच आत निघून गेले. रणवीरचा आपल्या पत्नीसाठी असलेला अंदाज चाहत्यांच्या मनाला भावला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी अधिकृत सोशल मीडियावर पेजवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.


