Latest Marathi News
Ganesh J GIF

मनसे आणि शिंदे गटाची युती होण्याआधीच तुटणार?

'त्या' बॅनरबाजीमुळे शिंदे गट मनसेच्या युतीत मिठाचा खडा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणूकीसाठी शिंदे गट आणि मनसे युती करणार असल्याची चर्चा आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी गणेश उत्सवात एकमेकांच्या घरी जात जवळीकता वाढत असल्याचे संकेत दिले होते. पण डोंबीवलीत मात्र शिंदे गट आणि मनसेत संघर्ष होण्याची शक्यता आगे. याला कारणीभूत आहे ठरलाय एमआयडीसी परिसरातील रस्ता.

पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डे पडून खराब झाले आहेत .यावरुन मनसेने शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.उडवत बॅनर लावले होते. शिंदे गटानेही बॅनरबाजी करत याला प्रतिउत्तर दिले आहे.डोंबिवली मधील एमआयडीसी निवासी परिसरात वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्याची कामे सुरु झालेली नाहीत. “कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त” आणि “मुहूर्त नेमण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे,” अशा आशयाचे बॅनर मनसे तर्फे लावण्यात आले होते. यावर वर्क आॅडर देखील चित्रित करण्यात आली होती.या बॅनरची चर्चा होत असतानाच आता मनसेच्या या टीकेला शिंदे गटाकडून देखील बँनरच्याच माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘उथळ प्रसिद्धीचा सोपा धंदा, आधी अभ्यास करावा नेटका मग यावे टिकेकरिता’ असा मजकूर लिहिलेले बँनर चौकाचौकात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये सुरु असलेल्या बॅनरबाजीत रस्ता कधी सुरु होणार याचे उत्तर मात्र जनतेला अजून तरी मिळालेले नाही.पण यामुळे मनसे शिंदे गटाची संभाव्य युती तुटण्याची शक्यता आहे.


डोंबीवलीत हा रस्ता मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे दोन्ही गट आक्रमक आहेत. एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी ११० कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यातील ४८ कोटीच्या कामांची निवीदा एमएमआरडीएने जाहीर केली होती. या कामाची वर्क ऑर्डर निघून दोन महिने झाले आहेत. अजून कामास सुरुवात झालेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!