Latest Marathi News
Ganesh J GIF

‘देऊळ बंद २’च्या यशाच्या आनंदात तरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर! लाडक्या ‘बाळा’चा भीषण अपघात

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या या मोठ्या यशाचा आनंद तरडे कुटुंब साजरा करत असतानाच, त्यांच्या आनंदावर विरजण घालणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण तरडे यांच्या कुटुंबातील अत्यंत लाडका सदस्य आणि त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांचा पाळीव श्वान ‘बाळा’ याचा भीषण अपघात झाला आहे.

या अनपेक्षित दुर्घटनेमुळे तरडे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर आपल्या लाडक्या ‘बाळा’सोबतचा एक अत्यंत भावुक व्हिडिओ शेअर करत या अपघाताची माहिती दिली आहे. “बाळाचा खूप मोठा अपघात झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे,” अशी अत्यंत क्लेशदायक माहिती त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.

नेहमी घरातील सदस्याप्रमाणे वावरणाऱ्या आणि सगळ्यांचा लाडका असलेल्या ‘बाळा’ची ही अवस्था पाहून स्नेहल तरडे कमालीच्या कोलमडून गेल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असून, ‘माझ्या बाळाला लवकर बरं कर’ अशी आर्त प्रार्थना स्वामींकडे केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर तरडे कुटुंबाचे चाहते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील ‘बाळा’च्या जलद प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!