
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जगभरातील अब्जावधी युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. फेसबुक , इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ची मूळ कंपनी असलेल्या ‘मेटा’ने आपल्या युजर्ससाठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू केले आहेत. कंपनीने आपली कमाई वाढवण्यासाठी हे नवीन ‘प्लस व्हर्जन’ बाजारात आणले असून, याचा थेट परिणाम या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होणार आहे.

यापूर्वी एलॉन मस्क यांच्या मायक्रोब्लॉगिंग ॲप ‘X’ ने अशाच प्रकारे सशुल्क प्रीमियम सेवा सुरू केली होती, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. आता नेमका हाच पॅटर्न फॉलो करत मेटानेही मोठे पाऊल उचलले आहे. जगभरातील युजर्ससोबतच भारतीय युजर्सनाही आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या ‘प्लस व्हर्जन’साठी पैसे मोजावे लागणार आहेत.

‘प्लस व्हर्जन’मध्ये काय असणार खास?

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या प्लस व्हर्जनचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना काही विशेष आणि प्रगत सुविधा मिळतील प्लस सबस्क्राइबर्सना काही विशेष टूल्स आणि कस्टमायझेशन फीचर्स दिले जातील. हे प्रगत फीचर्स आतापर्यंत सर्व युजर्सना मोफत मिळत होते, परंतु यापुढे ते नेहमीच्या मोफत व्हर्जनमध्ये उपलब्ध नसतील. व्यावसायिक आणि क्रिएटर्ससाठी हे फीचर्स अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
मेटाने या तिन्ही ॲप्सच्या प्रीमियम फीचर्ससाठी जागतिक स्तरावर त्यांचे मासिक प्लॅन जाहीर केले आहेत. भारतीय चलनानुसार हे दर अंदाजे खालीलप्रमाणे असू शकतात
इंस्टाग्राम प्लस सुमारे ३८७ रुपये
फेसबुक प्लस सुमारे ३८७ रुपये
व्हॉट्सॲप प्लस सुमारे २९० रुपये
मेटाने अद्याप जागतिक किमती जाहीर केल्या असल्या, तरी भारतासाठी या मासिक प्लॅनची अधिकृत किंमत किती असेल, याची नेमकी आणि अंतिम घोषणा केलेली नाही. भारतीय बाजारपेठेसाठी यात काही बदल होऊ शकतात.
मोफत व्हर्जन बंद होणार का?
सर्वसामान्य युजर्ससाठी दिलासादायक बाब म्हणजे, या तिन्ही सोशल मीडिया ॲप्सचे नेहमीचे मोफत व्हर्जन पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. परंतु, जे युजर्स नवीन आणि प्रगत टूल्स वापरू इच्छितात, त्यांनाच आता दरमहा खिसा खाली करावा लागणार आहे. मेटाच्या या मोठ्या निर्णयामुळे आता टेक जगतात आणि सोशल मीडिया युजर्समध्ये नवीन चर्चा रंगू लागली आहे.

