Latest Marathi News
Ganesh J GIF

बारामती हादरली! पतीचा जीव घेण्याचा कट उघडकीस; पत्नीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच, बारामती शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गुंगीचे औषध देऊन, त्याच्यावर बॅटने हल्ला केल्याचा आणि थेट घरातच पुरण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३० जुलैच्या रात्रीपासून १ ऑगस्टच्या सकाळदरम्यान घडली आहे. आरोपी महिलेने तिचे पती प्रवीण प्रकाश जगताप (वय ४१) यांना खाण्या-पिण्यातून गुंगीचे औषध दिले. पती अर्धबेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर बॅटने प्राणघातक हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता, जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पतीला घरातील हॉललगतच्या गॅलरीत असलेल्या चौकोनी कट्ट्यात टाकून, त्यावर फरशी बसवून पुरण्याचा कट आखला गेला होता. मात्र, हा कथित प्रकार वेळेत उघडकीस आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल

या प्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय ७१, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सून शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

सध्या जखमी प्रवीण जगताप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण काय होते? यात आणखी कोणाचा हात आहे का? या सर्व बाजूंचा तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!