Latest Marathi News
Ganesh J GIF

माहिती देऊनही कारवाई नाही.? उरुळी कांचन व यवत परिसरातील कथित अवैध व्यवसायाबाबत नागरिकांचा सवाल

उरुळी कांचन / यवत : प्रतिनिधी  उरुळी कांचन व यवत परिसरातील काही ठिकाणी कथितरित्या अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या संदर्भात संबंधित पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरणावर परिणाम होत असून महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित ठिकाणांची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे. “पोलीस प्रशासनाला माहिती देऊनही या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी व आवश्यक कारवाई कधी केली जाणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित पोलीस प्रशासनाची अधिकृत बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, प्रशासनाने तक्रारींची पडताळणी करून कायद्याचे उल्लंघन होत असल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्थानिक पोलिसांच्या समोर हे सगळ सुरू असताना सुद्धा पोलिस अधिकारी कारवाई का करत नाहीत,असा पण प्रश्न निर्माण होत आहे.कधी कारवाई करणार असा सुद्धा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!