अविवाहित महिलांनाही करता येणार गर्भपात पण….
न्यायालयाचा एैतिहासिक निर्णय, 'हे' नियम आणि अटी लागू असणार
दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- भारतातील अविवाहित महिलांनाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका वैद्यकीय प्रकरणाचा निकाल देताना सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, भारतातील गर्भपात कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही. अविवाहित महिला २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकते. भारतातील गर्भपात कायद्यानुसार, विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही. गर्भपाताच्या उद्देशाने होणाऱ्या बलात्कारात वैवाहिक बलात्काराचाही समावेश होतो. न्यायालयाने निर्णय देताना म्हटले आहे की, एमटीपी कायद्यांतर्गत अविवाहित महिलांना लिव्ह-इन रिलेशनशिपमधून वगळणं म्हणजे असंवैधानिक आहे. तसेच कलम २१ अंतर्गत मुलं जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा अधिकार विवाहित स्त्रियांसोबतच अविवाहित स्त्रियांनाही समान हक्क आहे. अगोदर सामान्य प्रकरणांमध्ये, २० आठवड्यांपेक्षा जास्त आणि २४ आठवड्यांपेक्षा कमी गर्भधारणेचा गर्भपात करण्याचा अधिकार आतापर्यंत फक्त विवाहित महिलांनाच होता.तसेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यांतर्गत बलात्कारामध्ये वैवाहिक बलात्काराचा समावेश असावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
देशातील न्यायव्यवस्था महिलांच्या सुरक्षेसाठी सतत काही ना काही निर्णय घेत असते. आता समाजातील संकुचित पितृसत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश संपून जाईल, असे सांगत न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.