Latest Marathi News
Ganesh J GIF

‘या’ साऊथ स्टार सोबत एकत्र येत ऎश्वर्याची गुडन्युज

रजनीकांतमुळे 'त्या' घोषणेपासून दोघांचा लवकरच यु टर्न

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- भारतातील चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज जोड्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अधूनमधून एैकायला येत असतात.काही चर्चा ख-या ठरतात काही अफवा असल्याचे लक्षात येते.पण काहीवेळा घटस्फोट घेणारी जोडी एकत्रही येते अशीच एक जोडी लवकरच एकत्र येणार आहे. साऊथ स्टार धनुष आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या पुन्हा एकत्र येणार आहेत.

या वर्षीच्या सुरुवातीलाच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता.पण आता पुन्हा एकत्र येण्यासाठी रजनीकांत यांच्या राहत्या घरी दोन्ही कुटुंबाची बैठक पार पडली.यावेळी त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः रजनीकांत आपल्या लेकीचा संसार टिकवण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करत आहेत.धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्ष एकत्र घालवल्यानंतर २०२२ यावर्षाच्या सुरुवातीला विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:ला समजून घेण्यासाठी वेळ हवा असल्याने वेगळा होण्याची निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. पण आता रजनीकांत यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले होते त्याला यश येत असून दोघेही लवकरच एकत्र येणार आहेत. या दोघांची भेट २००४ साली एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी झाली होती. दोघांचे लग्न झाले त्यावेळी धनुष २१ तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती.

धनुष ‘काढाल कोंडे’ चित्रपट पाहायला गेला त्यावेळी ऐश्वर्या आणि तिची बहिण सौंदर्यशी भेट झाली होती. तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे ऎश्वर्याने धनुषला प्रपोज केले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत होती. त्यांच्या कुटुंबियांनी दोघांनाही लग्नाचा सल्ला दिला होता. पण व्हाय दिज कोलावरी डी या गाण्याने ही जोडी सगळीकडे प्रसिद्ध झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!