Just another WordPress site

‘तुम्ही मंदिरं बंद केली, पण तुमची दुकानं सुरु होती’

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप

मुंबई दि ५(प्रतिनिधी) – ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण संपताच एकनाथ शिंदे यांनी बीकेसीतील दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली. तुम्ही बाळासाहेबांना हिंदुह्रदयसम्राट म्हणायचे विसरलात पण आज बाळासाहेबांचे स्वप्न मोदी शहा करत आहेत असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

GIF Advt

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना जोरदार टिका केली. एकनाथ शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदेंने नेहमीच दिलं आहे, हा देणारा एकनाथ आहे घेणारा नव्हे, शिवाय तुमच्यात आणि माझ्यात काय ठरलं होतं हे मी आज सांगणार नाही मात्र वेळ आल्यावर करेन असा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला. मागील अडीच वर्षात मंत्रालयावर झेंडा शिवसेनेचा पण अजेंडा राष्ट्रवादीचा होता असा दावा करताना मला तुम्ही कट्प्पा म्हणता पण तुम्ही तर दुपट्टे आहेत त्याच काय करायच असा सवाल विचारला आहे. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता पण खासदार, आमदार यांनी आंदोलने केली, लाठ्या खाल्ल्या, पोलीस केसेस घेतल्या. वेड्यासारखं काम केलं, त्यांना तुम्ही गद्दार म्हणता? आम्ही गद्दार नाही, तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला, तुम्ही पाप केलं. त्याबद्दल आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका. माफी मागा, मग आम्हाला बोला. असे आव्हान शिंदे यांनी ठाकरेंना दिले आहे.बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा जो हरामखोर असा उल्लेख केला, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वाईट वाटलं असेल. आम्ही जाहीर भूमिका घेतली. लपून छपून घेतली नाही. असे सांगत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. माझ्या नातावर टिका करता पण त्याचा जन्म झाल्यापासून तुमचे अधःपतन सुरु झाले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

तुम्ही कोरोना काळाच सर्वसामान्य गरिबांची दुकानं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमचे दुकानं सुरु होती’, असं धक्कादायक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही दुकानं म्हणजे नेमकी काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!