
पुणे दि ६ (प्रतिनिधी)- आज पुण्यात महापालिकेच्या विविध पदांसाठीच्या भरतीसाठीचा पेपर होता. पण या पेपरच्या वेळेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे या व्हिडिओचे नागरिकांनी कौतुक केले आहे. खाकी वर्दितली माया या निमित्ताने दिसून आली आहे.
पुण्यातील दोन महिला पोलीस एका बाळाला सांभाळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हडपसर इथल्या एका परीक्षाकेंद्रावर पुणे महापालिकेच्या विविध पदांमधील विधी अधिकारीपदासाठी परिक्षा सुरु होती. या परीक्षेला अनेक विवाहित महिलासुद्धा परीक्षेसाठी बसल्या होत्या. काही महिला लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या. तसंच अनेक महिलांचे नातेवाईक सुद्धा आले होते. अशातच हडपसरमधील रामटेकडी परीक्षा केंद्रावर एका चार महिन्यांच्या बाळ रडताना महिला पोलीसांनी पाहिले. त्यांनी लगेच त्याला घेत त्याच्यासोबत खेळू लागल्या.या सांभाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या आपुलकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
खाकी वर्दी फक्त धाक दाखवण्यासाठीच असते असा आजवरचा समज होता. पण अलीकडे खाकीतही एक माणूस असतो एक आई असते असे प्रसंग दिसून आले आहेत. तशाच पद्धतीने खाकी वर्दी एका चिमुकलीसाठी आई बनून आली होती.त्यामुळे व्हिडीओचे काैतुक होत आहे.