Latest Marathi News
Ganesh J GIF

ठाकरे शिंदे लवकरच एकत्र येणार ठिकाण आणि तारीख ठरली

दिलजमाई होण्यासाठी 'या' ठिकाणाची निवड, 'या' तारखेला घडणार इतिहास

मुंबई दि ६(प्रतिनिधी) – शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दसरा मेळाव्यात तर पराकोटीची टिका करण्यात आली.पण लवकरच ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आहेत यासाठीचे ठिकाणही ठरले आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

पण एकत्र येणारे ठाकरे आणि शिंदे हे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे नाहीत तर जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची कन्या अनुराधा यांचा विवाह ८ ऑक्टोबरला होणार आहे. सध्या राज्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरेंमध्ये फूट पडली असली तरीही जुन्नर तालुक्यात मात्र ठाकरे आणि शिंदे यांच्यात दिलजमाई होणार आहे.या लग्नाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. यांच्यासारखे आपली सगळी कटुता विसरून पुन्हा ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावी अशी इच्छा मात्र सच्चा शिवसैनिक या निमित्ताने करत आहे.तत्पूर्वी अनेकांनी ठाकरे आणि शिंदे परिवाराला लग्नाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकाणात कधी काय घडेल हे सांगता येणार नाही. अडीच वर्षापूर्वी अनेकांना अपेक्षित नसलेली महाविकास आघाडी सत्तेत आली.तर कारभार व्यवस्थित सुरु आहे असे वाटत असतानाच शिंदे यांनी बंड करत ठाकरेंना खाली खेचत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे एकमेकांवर टिका केली जात आहे.पण पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे अनेकांच्या चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!