मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मुलांमध्ये रस्त्यावर झालेली मारामारी आपण खुपवेळा पाहिली असेल पण अलीकडे मुलींमध्ये मारामारी झाल्याचा अनेक घटना समोर येत आहेत. अनेकदा तर सार्वजनिक ठिकाणीच एकमेकींच्या झिंज्या ओढताना त्या दिसतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असुन दोन मुली रस्त्यावरच भिडल्याचे दिसत आहे.
एका मुलीने दुस-या मुलीवर आपले न्युड फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे सांगत दुस-या मुलीसोबत मारामारी करत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसते की त्यांच्या या अगोदरही मारामारी झाली होती. त्यावेळी जमलेल्या लोकांमधील एक जण का भांडत आहात असे विचारतो तेंव्हा एक तरुणी दुसरीवर स्वतःचे नग्न फोटो एका पुरुषाला पाठवल्याचा आरोप करते. फक्त आरोपच करत नाही तर तिला मारण्यासाठी दुसऱ्या तरुणीच्या अंगावर धावून जाते.यावेळी हाणामारी करतच दुसरी तरुणी पहिल्या तरुणीचा आरोप ऐकून पुरावे मागते यावर माझ्याकडे पुरावे आहेत असा दावा करून ती फोटो लीक करण्याबाबत स्पष्टीकरण मागत पुन्हा दुसरीला मारहाण करू लागते. यावेळी घरी येण्याचीही धमकी देत आहेत.पण एकजणही त्यांचे भांडण मिटवताना दिसत नाही. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत.
Kalesh B/w Two Girls On Road pic.twitter.com/Zz57A2XbxV
— r/Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 5, 2022
मुलींमध्ये हाणामारी होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. कधी बाॅयफ्रेंडवरून तर कधी हेव्यादेव्यावरुन मुलींमध्ये मारामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.नुकताच मुंबई लोकलमध्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रश्न केला आहे. तर काहींनी पोलिसांच्या दक्षतेवरही प्रश्न उभे केले आहेत.