सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, हाणामारीचे कारण समोर
पुणे दि १२(प्रतिनिधी) – मुंबई-पुणे दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे एक्सप्रेसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने अनेकदा वाद होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अशाच गर्दीने भरलेल्या सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यात प्रवाशांमध्ये जागेवरून तुफान हाणामारी झाली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सिंहगड एक्सप्रेस चिंचवड स्टेशनवर येताच रेल्वेच्या डब्यात जागा पकडण्यासाठी तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ तिथेच असलेल्या काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. जेंव्हा प्रवासी बसमध्ये चढले त्यावेळी जागा पकडण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की गर्दीमध्ये एकमेकांना अक्षरशः खाली पाडत हाणामारी सुरू झाली. यावेळी इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे करत भांडणे सोडवली. आणि या वादावर पडदा टाकला. पण तोपर्यंत ही हाणामारी प्रवाशांनी कॅमे-यात कैद झाली आहे. अलीकडे रेल्वेत हाणामारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. महिलांच्या हाणामारीच्या घटनाचे व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता पुरूषांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये अनेक चाकरमानी प्रवास करत असतात. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वेत डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवासी करत आहेत.मात्र प्रवासी संघटनेच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.