Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मंत्री झाले म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते’

शिंदे गटातील आमदार मंत्री यांच्यात पुन्हा धुसफुस, हाच पक्ष कारणीभूत

जळगाव दि २२(प्रतिनिधी)- जळगावात शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाणीपुरवठ्याच्या कामावरुन चिमणराव पाटील नाराज झाले आहेत. आपल्याच मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याची कामे दिल्याने चिमणराव पाटीलांनी गुलाबराव पाटलांना इशारा दिला आहे.

चिमणराव पाटील म्हणाले, की ‘सरकारमध्ये आपण काम करतो तेव्हा ते सरकार बनवण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकाचं योगदान असतं. एका-एका मतावर सरकार येतं आणि कोसळतंही. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारसारखं. त्यामुळे मंत्री झालं म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते. याचं भान ठेवा’ असा इशारा देताना माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांना फोन केला. त्यांन यापुढे असे व्हायला नको असे सांगितले आहे. मला डावलण्याचा त्यांचा काय संब हे एकदम चुकीचे आहे,” असेही चिमणराव पाटील म्हणाले आहे. राष्ट्रवादीमुळे आम्ही बंड केले अस सांगणारे शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादीमुळे एकमेकावर तोंडसुख घेताना दिसत आहेत.

शिवसेनेत असतानाही गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यात संघर्ष होत आलेला आहे. गुलाबराव पाटलांनी जेंव्हा शिंदे गटात प्रवेश केला होता तेंव्हा ‘ज्या माणसाला एवढं मंत्री केलं तो फुटेल, असं मला वाटत नव्हतं. गुलाबराव पाटलांनी १० जन्म घेतले तरी उद्धवसाहेबांनी केलेले उपकार फिटणार नाहीत, असे पाटील म्हणाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!