Just another WordPress site

ऋतुराज गायकवाड माझ्यापेक्षा कितीतरी……

अभिनेत्रीचा मोठा गोैप्यस्फोट, बघा नक्की काय म्हणाली

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमात तिने आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. सायली संजीवचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तिने नुकतीच ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यात तिने मोठे खुलासे केले आहेत.

GIF Advt

कार्यक्रमात तिने चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर असल्याच्या चर्चेचा इन्कार केला आहे. ती म्हणाली तो ‘काहे दिया परदेस’ मालिकेचा फॅन होता. मलाही आश्चर्य वाटलं होतं, पण माझ्यापेक्षा तो खूपच लहान आहे, असं म्हणत सायलीने या अफवा असल्याचं स्पष्ट केले. त्याचबरोबर ऋतूराज माझा खूप चांगला मित्र आहे. आयपीएल खेळणारे दोन-तीन जण माझे मित्र आहेत. एक आरसीबीमध्ये आहे, ऋतुराज आणि तुषार देशपांडे सीएसकेमध्ये आहेत. असेही ती म्हणाली.कार्यक्रमात सायलीला प्रपोज करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सायली म्हणाली कॉलेजमध्ये असताना मी ज्या मुलांना प्रपोज केलं, त्यापैकी एकाही मुलाने मला होकार दिला नाही असे म्हटल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

सुबोध भावेचा ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या बराच गाजतोय. आतापर्यंत सुप्रिया सुळेंपासून सोनाली कुलकर्णीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. सध्या सायली संजीवची प्रपोज क्लिप गाजत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!