निलम गो-हेंच्या निकटवर्तीय या पदाधिका-याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र
निलम गो-हे शिवसेना सोडणार असल्यांचा चर्चेला बळकटी
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेनेत सुरु असलेली गळती अजून चालूच आहेत. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
युवा सेना सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३५ पदाधिकारी युवा सेनेतून बाहेर पडणार आहेत. पक्षात संधी दिली जात नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.यावर बोलताना येवले म्हणाल्या की,मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं योग्य नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. ३५ पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत.युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वरुण सरदेसांचा फोन आला होता. त्यांनी फोन करून मुंबईत भेटीसाठी बोलावले आहे. आम्ही पदाधिकारी मुंबईत बैठकीला जाणार आहे. मात्र आम्ही राजीनामा देण्यावर ठाम आहोत असे येवले म्हणाल्या आहेत.
शर्मिला येवले या नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच शर्मिला यांचा हा राजीनामा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. ओम बिर्ला यांची निलम गो-हे यांनी भेट घेतली यावेळी तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असल्यामुळे गो-हे देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर हे राजीनामा अस्त्र सुरु झाले आहे.