Just another WordPress site

ही अभिनेत्री लवकरच या व्यावसायिकाबरोबर अडकणार लग्नबंधनात

स्वतः फोटो शेअर करत लग्नाबद्दलच्या चर्चेला उत्तर, बघा कोण आहे तो

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती आहे तिच्या लग्नाची चर्चा. तमन्ना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तमन्नाने तिच्या लग्नाबद्दलच्या चर्चांवर उत्तर देत स्वत:च खुलासा केला आहे. तिने एक फोटो देखील पोस्ट केला आहे त्यामुळे चर्चा सुरु आहेत.

GIF Advt

बाॅलीवूडमधील एक पेज वायरल बियानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन तमन्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना हिरव्या रंगाची साडी नेसून ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी “तमन्ना भाटिया एका व्यावसायिकाशी लग्न करणार आहे?”, असं कॅप्शन दिले होते तमन्नानेही हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत “खरंच?” असं कॅप्शन लिहून इमोजी पोस्ट केले होते. त्यामुळे या चर्चेला जोर आला आहे. पण नंतर तमन्नाने तिच्या होणाऱ्या व्यावसायिक पतीचा फोटो देखील शेअर केला आहे. यात तमन्नाचा होणारा नवरा दुसरा-तिसरा कोणी नसून तिचाच पुरुष वेशातील फोटो आहे. जीन्स, टी-शर्ट, जॅकेटबरोबर मुलासारखे छोटे केस आणि मिशी लावून तमन्नाने फोटो स्टोरी मध्ये पोस्ट केला होता यात “माझ्या व्यावसायिक पतीची ओळख करुन देत आहे” असं कॅप्शन देत तिने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यामुळे तमन्नाच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं समोर आले आहे.त्यामुळे तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

तमन्ना ही साऊथ चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.सुपरहिट ‘बाहुबली’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या तमन्नाने बाॅलीवूडमधील ‘एन्टरटेन्मेंट’, ‘हिंमतवाला’, ‘रिबेल’ अशा हिट चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बबली बाऊन्सर’ हा तिचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ चित्रपटात ती रितेश देशमुखसह स्क्रीन शेअर करताना दिसली होती. पण ति लग्न करणार हा प्रश्न अनुत्तरितच राहीला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!