पाच तरुणींनी एका तरुणीची यात्रेत केली जोरदार धुलाई
एका बाॅयफ्रेंडवरून पाच तरुणी भिडल्या, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
सारण दि २९(प्रतिनिधी)- बिहारच्या सारणमध्ये मुलींची मारामारी झाली. एका जत्रेत पाच तरुणींनी मिळून एकीला धोपटले आहे. प्रियकरावरून हा राडा झाला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एकाने मारामारीचा व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीला मिळून पाच जणी जबरदस्त चोप देताना दिसून आल्या. कुणी या मुलीचे केस ओढले तर कुणी तिला ठोसे हाणले. कुणी लाथा घातल्या. तर कुणी तिला खाली पाडत बेडके.या दरम्यान एक मुलगा मात्र या मुलीला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. पण तरिही या मुलीला मारहाण करत आहे. हा व्हिडीओ एका जत्रेतील आहे. सोनपूर येथे एका जत्रेचं आयोजन करण्यात आलं. या जत्रेच तरुणींची झालेली फ्री स्टाईल हाणामारी चर्चेत आली आहे.
एक बॉयफ्रेंड के लिए कई लड़कियों की आपस में हुई लड़ाई, जमकर चले लात-घुसे,
वीडियो बिहार के सोनपुर का बताया जा रहा है.#sonpur #Bihar #sonpurmela pic.twitter.com/1Vbc8fnE6O
— रौशन कुमार -Roshan kumar (@Roshan_FD) November 29, 2022
दुसऱ्या तरुणीच्या प्रियकराला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानं हा वाद झाला. दुसरीच्या प्रियकराला जाळ्यात ओढणारी तरुणी ५ जणींना जत्रेत दिसली. तिच्यासोबत प्रियकरदेखील होता. ते पाहून ५ जणी संतापल्या. त्यांनी तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.