माॅडेलच्या राजभवनातील फोटोशुटमुळे राज्यपाल कोश्यारी अडचणीत
ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, राज्यपालांच्या अडचणीत वाढ
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरून ते वाद ओढवून घेत आहेत. आता पुन्हा एकदा कोश्यारी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण ठरली आहे त्यांना भेटण्यासाठी आलेली एक माॅडेल तिचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांची मायरा मिश्रा या मॉडेलने राजभवनात भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसेच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यावर मनसेने आक्षेप घेत राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, “ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?” या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यपालांच्या खूर्चीसोबत मायरा मिश्राचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजभवनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून राज्यपालांच्या दालनात ते नसताना परस्पर फोटो काढल्यामुळे त्या महिलांना समज देण्यात आली आहे. राज्यपालांच्या भेटीसाठी एका एनजीओच्या काही महिला राजभवनात आल्या होत्या. त्यात मायराचाही समावेश होता.
ठीकाण राजभवनही बाई कोण ?
अभिनेत्री आणि माॅडेल राजभवनात काय करतेय ?राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही ?@mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/gmhQWiO3KN— Manoj B Chavan (@ManojBChavan5) December 7, 2022
मायरा मिश्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या ११ सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर मायरा मिश्रा चर्चेत आली. उत्तर प्रदेशमध्ये जन्म झालेल्या मायराने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशोका, उडाण, बहू बेगम आणि भंवर सारख्या टीव्ही मालिकांमध्ये तीने भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबकच मॉडलिंगमध्येही तीने आपली छाप उमटवली आहे.