Just another WordPress site

फेमस माहिला युट्यूबरला हनीट्रॅप प्रकरणी पोलीसांच्या बेड्या

व्यावसायिकाला आपल्या प्रेमाच्य जाळ्यात ओढत केले असे काही की...

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून ८० लाखांचा गंडा घालणाऱ्या युट्यूबर नामरा कादिरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. नामरा कादिर सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे युट्यूबवर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरही तिला दोन लाखांहून अधिक जण फॉलो करतात. पोलीस आता तिचा पती विराट बैनीवाल याचा शोध घेत आहेत.

एका व्यावसायिकाने नामराने आपली ८० लाखांची फसवणूक केली असून, तिचा पती विराटही यात सहभागी असल्याचे सांगत, तिने आपल्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांनी हे पैसे वसूल केले असल्याची तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नामराला व्यावसायिकाने जाहिरातीसाठी अडीच लाख रूपये दिले होते. पण नामराने काम केले नाही. त्यानंतर नामराने त्या व्यावसायिकाला “मला तुम्ही आवडत असून, तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. आपल्या बहिणीच्या लग्नानंतर हे पैसे आपण परत करु” असे सांगितले. त्यानंतर दोघांचे बाहेर फिरणे चालू झाले विशेष म्हणजे नामराचा पतीही त्यांच्या सोबत असायचा. एक दिवस पार्टीसाठी केल्यानंतर विराट आणि नामराने त्याला दारु पाजली. हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. सकाळी उठल्यानंतर नामराने त्याच्याकडे कार्ड आणि घड्याळ मागितलं. विरोध केला असता बलात्काराची तक्रार दाखल करणार अशी धमकी देत आत्तापर्यंत ७० ते ८० लाख लुटल्याची तक्रार व्यावसायिकांने पोलिसांना दिली आहे.

GIF Advt

पोलिसांनी नामरा कादिरला अटक केली असून, जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तिचा पती विराट सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण प्रसिद्ध युट्युबरला हनी ट्रॅपमध्ये अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!