Latest Marathi News
Ganesh J GIF

क्षुल्लक कारणावरून दोन डाॅक्टरांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद, गावकऱ्यांनी दिली वेगळीच माहिती

बीड दि ८(प्रतिनिधी)- बीडच्या मदळमोहीत दोन डॉक्टरमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठलदास हरकुट आणि यांनी अतुल बिर्ला हे दोघे डॉक्टर आहेत. डोक्यावर असलेल्या विग वरुन चालु असलेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले.

मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर हरकुट यांनी अतुल बिर्ला यांना तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं विचारल आणि हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चार जनासह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आणि याच अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या दोघांमध्ये हाणामारी झाल्याने ती चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेमध्ये हे दोन्ही डॉक्टर माधवी या गावी आपल्या डॉक्टरकी करतात. एकाचा दवाखाना मोठ्या प्रमाणात चांगला चालतोय तर दुसऱ्या डॉक्टरांना मात्र हवा तसा प्रतिसाद येत नाही. दोन्ही क्लिनिकमध्ये अंतर ही फारसे नाही. यामुळेच या दोघांत नेहमीच भांडणे होतात असे तिथल्या गावकऱ्यांनी सांगितले आहे. हे दोन्ही डॉक्टर एकमेकांना कधीच नीट बोलत नाहीत अशी देखील माहिती तिथल्या नागरिकांनी दिली आहे. हा वाद सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने याचा फायदा घेत डॉक्टर हरकोटने बिर्ला विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामध्ये शिवीगाळ केली असेही त्यांनी म्हटले आहे. सीसीटीव्हीमध्ये देखील मारहाण करताना डॉ. बिर्ला दिसतं आहेत.

या डॉक्टरांचे नेहमीचेच वाद असल्याचे स्थानिक लोक म्हणतात. हा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. डॉक्टरांची फ्री- स्टाईल हाणामारीची सध्या सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!