अतिउत्साही तरुणाला बैलाने शिंगावर घेत हवेत भिरकावले
बैलगाडा शर्यतीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल, तरुणाची अवस्था झाली...
पुणे दि १०(प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींना उधाण आले आहे. प्रत्येक यात्रेमध्ये बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. मात्र, यात अतिउत्साह तरुणांना अनेक घटनांना सामोरे जावे लागते.अशाच एका अतिउत्साही तरूणाला बैलाने आपल्या शिंगावर घेत अस्मान दाखवले याचा व्हिडिओही समोर आला आहे.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आली होती. शर्यतीची बारी झाल्यानंतर उधळलेला बैल पकडणे एका तरुणाच्या अंगलट आले आहे. बैलगाडा घाटासमोर बनवण्यात आलेल्या रिंगणात एका बैलाने त्याला पकडण्यासाठी आलेल्या तरूणाला आपल्या शिंगावर घेऊन खाली आपटल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सुदैवाने या तरुणाला गंभीर दुखापत झाली नाही. ग्रामीण महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर बैलगाडा शर्यत पुन्हा झाली. शर्यतीच्या बैलांना पुन्हा लाखोंचा भाव आला आहे.
पुणे जिल्ह्यात यात्रा आणि बैलगाडा शर्यती हे अतुट समीकरण राहिले आहे. न्यायालयाने शर्यतीवर बंदी घातल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला होता. पण पुन्हा एकदा न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर गावचे घाट शर्यतीसाठी सज्ज झाले आहेत. पण अशावेळी उत्साह जरी असला तरी काळजी घेण्यचीही गरज आहे.