Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबई-पुणे महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार

चालकाशिवाय इतक्या मीटर चालला ट्रक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पुणे दि १०(प्रतिनिधी)- मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर कार अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आताही भरधाव ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हने बाहेर उडी मारली. त्यामुळं विनाचालक ट्रक सुस्साट धावत होता. याचा थरार कॅमे-यात कैद झाला आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव ट्रकचा अमृतांजण पुलाजवळ ब्रेक फेल झाल्यानं ट्रक रस्त्यालगतच्या खडकाला जाऊन आदळली. ड्रायव्हरनं वेळीच ट्रकच्या बाहेर उडी मारल्यानं त्याचा जीव वाचला आहे. अपघातग्रस्त ट्रकनं इतर कोणत्याही ट्रकला धडक न दिल्यानं मोठा हानी टळली आहे. पुण्याहून सिमेंटच्या गोण्या घेऊन निधालेल्या ओव्हरलोड ट्रक मुंबई-पुणे महामार्गावरील अमृतांजण पुलाडजवळ येताच त्याचा ब्रेक फेल झाला. त्यामुळं ट्रकवरील नियंत्रण सुटत असल्याचं समजताच चालकानं बाहेर उडी मारली. त्यामुळं ५०० मीटरपर्यंत ट्रक कोणत्याही चालकाशिवाय धावत होता. घाट उतारावर ट्रक वेगाने अमृतांजन पुलाच्या पुढे गेला आणि बोरघाट पोलिस चौकीच्या पुढे रस्त्याच्या कडेला आदळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचा ब्रेक फेल पुणे हद्दीत झाला तर तो रायगड हद्दीत एका डोंगराला आदळला. या घटनेची नोंद खालापूर पोलिसांकडून घेतली गेली आहे. तर चालक संजय यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं आता मुंबई-पुणे महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याची घटना समजताच स्थानिकांनी घटनास्थळी घेतली. स्थानिकांनी अपघातग्रस्त ट्रकच्या समोरून येणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय अपघाताच्या काही वेळाच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आता अपघातग्रस्त ट्रकला रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आलं असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!