Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीला मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने पाठवले समन्स

अभिनेत्रीला या दिवशी चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अभिनेत्रीला समन्स बजावले आहे. रकुल प्रीतला टॉलिवूड ड्रग्स आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार अभिनेत्रीला १९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

रकुल प्रीतला ईडीने ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. हे ड्रग्ज प्रकरण जुलै २०१७ मध्ये चर्चेत आले होते, जेव्हा कस्टम अधिकाऱ्यांनी संगीतकार कॅलविनकडून ३० लाख रुपयांचे ड्रग्ज ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बोलताना ईडीने म्हटलं होतं की, तेलंगाना एक्साईजने या प्रकरणी १२ लोकांवर केस दाखल केली होती. ११ चार्जशीट फाईल दाखल केली. यापैकी ८ लोकांविरोधात ड्रग्ज प्रकरणी चार्जशीट फाईल केली आहे. आम्ही एक्साईज ऑफिशिअल्सना साक्षीदार होण्यासाठी सांगितलं आहे. याप्रकारे आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत टॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांना साक्षीदार मानले जाईल. ईडीने या प्रकरणात अभिनेत्रीला सप्टेंबर महिन्यात देखील चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास अडीच तास रकुल प्रीतची चौकशी केली होती. या प्रकरणी राणा दग्गुबती, पुरी जगन्नाथ, रवी तेजा, चार्मी कौर, नवदीप आणि इतर सेलिब्रिटींनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

तेलंगणाच्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने २०२१ मध्ये पर्दाफाश केलेल्या एलएसडी आणि एमडीएमए सारख्या अंमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या खळबळजनक रॅकेटच्या संबंधात अनेक टॉलीवुड सेलिब्रिटी ईडीसमोर हजर झाले. याप्रकरणी रकुल प्रीत, राणा दग्गुबती, तेजा, पुरी जगन्नाथ, चार्मे कौर आणि मुमैथ खान यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!