Latest Marathi News
Ganesh J GIF

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा दगडफेक

ग्रामपंचायत निवडणूकीत गाैतमीच्या अदा, दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल

बीड दि १६(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलचे नाव सध्या सगळ्या तरुणाच्या तोंडपाठ झाले आहे. तिची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्याचबरोबर गाैतमी आणि गर्दी असे समीकरण देखील पहायला मिळत आहे. ती जिथे जाईल तिथे गर्दी होत असते. गाैतमीच्या बीडमधील एका कार्यक्रमात असाच एक राडा झाला आहे.

बीड शहराजवळील बीड -परळी राष्ट्रीय महामार्ग लगत घोडका राजुरी शिवारात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बारमालक रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने गौतम पाटील हिला बोलावण्यात आले होते. गौतमी पाटील म्हणल्यावर तरुणांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या कार्यक्रमादरम्यान शेकडो लोक स्टेजवर चढल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी स्टेजवर दगडफेक झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. गौतमी पाटील सुखरूप असून कार्यक्रमाच्या आयोजकांवर हा कार्यक्रम अर्ध्यावर बंद करण्याची वेळ आली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी दिसत नसून, स्टेजवर फक्त प्रेक्षकांचाच घोळका दिसत आहे.

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याच्या आरोपामुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती. पण तरीही तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. तिच्या डान्सच्या व्हिडीओ क्लिपही व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी तिच्या एका कार्यक्रमात एका शाळेचा छत तुटलं होतं, तसंच एकाचा मृत्यूही झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!