बाॅयफ्रेडने दगा दिल्याने या अभिनेत्रीने घेतला धक्कादायक निर्णय
बाॅयफ्रेंडला अटक, लव्ह जिहाद व प्रेमभंगाच्या चर्चेवर पोलिसांचा खुलासा
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होताना दिसत आहे. तिच्या मृत्यूनतंर अभिनेत्रीच्या आईने ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खानला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आता या आत्महत्येमागे वेगळीच शंका व्यक्त केली जात आहे.
तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर शिझान खानवर तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्याने प्रेमसंबंध तोडल्यामुळे तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. शिझान तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असतानादेखील तो इतर मुलींचा संपर्कात होता. त्यामुळेच तुनिषा तणावात होती. शिझान आपल्याला फसवत आहे, हे समजताच तिला पॅनिक अटॅक आला होता अशी देखील चर्चा आहे. तसेच चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल अशी अपेक्षा भाजप आमदार राम कदम यांनी व्यक्त केली होती. पण पोलीसांनी लव्ह जिहादची शक्यता फेटाळली आहे. सध्या तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही.
तुनिषाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. यात तिच्यासोबत शिझान होता. त्याचबरोबर तुनिशाने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती. तिच्यावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.