Latest Marathi News
Ganesh J GIF

अध्यक्ष बदलला नाहीतर पुणे महापालिकेत भाजपाचा पराभव

भाजपाच्या नेत्याची पक्षाविरोधात भूमिका, पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर

पुणे दि २६(प्रतिनिधी) पुणे महापालिका पुन्हा एकदा जिंकण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली असतानाच पक्षातील अंतर्गत गडबाजी उफाळून आली आहे. पुण्यातील भाजपाच्या एका गटाने थेट शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे त्यामुळे भाजपासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजप नेते आणि माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना पदावरून हटवावे, अशी जाहीर मागणी केली आहे. ‘पुणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात बदल करणे आता गरजेचे आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे अथवा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना अध्यक्ष केले पाहिजे, नेतृत्व बदल झाला नाही तर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे अवघड आहे. जगदीश मुळीक यांना खासदारकी द्या आणि पुनर्वसन करा पण शहराध्यक्ष पद त्वरित बदलले पाहिजे सिद्धार्थ शिरोळे हा योग्य उमेदवार आहे.’ असं केसकर म्हणाले आहेत.जगदीश मुळीक यांच्याकडे भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पुण्याचे ते २०१९ पासून शहराध्यक्ष आहेत. महापालिकेत प्रशासक आल्यापासून अध्यक्ष बदलण्याची मागणी दबक्या आवाजात होत होती. पण आता उज्ज्वल केसकर यांनी फेसबुक पोस्ट करत थेट शहराध्यक्ष बदलण्याची जाहीर मागणी केल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

पुणे शहरात भाजपासाठी नेतृत्वावरुन कायमच मतभेद दिसून आले आहेत. गडकरी मुंडेच्या काळातील पुण्यातील भाजपा नेहमीच विभागलेली असायची. तर आताही काकडे आणि गिरिश बापट यांच्यात अधूनमधून वाद होत असतात त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री करुन भाजपाने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता पण आता पुन्हा एकदा भाजपातील गटबाजी उफाळून आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!