पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा हिंदकेसरी
महाराष्ट्र केसरीनंतर हिंद केसरीच्या गदेवर कोरले नाव, अशी जिंकली फायनल
तेलंगणा दि ८(प्रतिनिधी)- तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेतील फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला आहे. महाराष्ट्राने अनेक वर्षानंतर हिंद केसरीची गदा जिंकली आहे.
अभिजीतने सामन्यात सोमवीरला एकही संधी दिली नाही आणि सामना ४-० ने जिंकला आहे. अभिजित हिंद केसरीचा मानकरी ठरला आहे. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणून हिंद केसरी ओळखली जाते.हिंद केसरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोमवीरला टिकू दिले नाही. अभिजितने हरियाणाच्या सोमवीरला ४-० अशा फरकाने लोळवत खिताबावर नाव कोरले आहे. प्रदिर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राने हिंद केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले आहे.
पुण्याच्या अभिजीत कटके याने रविवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशा गुणफरकाने मात करत प्रतिष्ठेची गदा पटकावली होती.