पुणे दि १५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यामध्ये घडली. हिंजवडी येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना ही घटना घडली.पण सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
हिंजेवाडीमध्ये कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रिया सुळे दीपप्रज्वलन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घातल होत्या.यावेळी टेबलवर ओवाळनीच्या एका ताटात छोटा दिवा ठेवला होता. याच दिव्यावर सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर आला आणि त्याने पेट घेतला. पण सुदैवाने या प्रकरणामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. साडीला आग लागल्यानंतर त्यांनी त्यांचा दैनंदिन कार्यक्रम याच साडीमध्ये सुरू ठेवला आहे.या घटनेनंतर सुप्रिया सुळेंना त्याच साडीत कार्यक्रम पूर्ण करत उपस्थितांना संबोधितही केले. यानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. यानंतर त्यांनी इतरांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मी सुखरुप आणि सुरक्षित आहे. कुणीही काळजी करू नका, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते फक्त दुर्दैव होतं बाकी काही नाही. मी थोडक्यात वाचले. साडीला आग लागल्याचे आमच्या लगेच लक्षात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरुन आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेय. मी सुखरुप आणि सुरक्षित आहे. कुणीही काळजी करु नये. आपण दाखविलेले प्रेम आणि काळजी माझ्यासाठी मोलाची आहे. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद, असे त्यांनी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.