Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेना नेत्याच्या जावायावर फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल

जावयासह सासऱ्यांनाही बेड्या पडणार, नवीन आरोपामुळे शिंदे गटात खळबळ

जालना दि १८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई क्रिकेटर विजय झोल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योजक किरण खरात यांनी ही तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. ते काम करत असताना त्यांना बीएमडब्ल्यु कार देखील मिळाली होती. त्यामुळे आकर्षित होऊन अनेकांनी क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवले होते. क्रिप्टो करंसीमध्ये अर्जुन खोतकर यांचे जावाई विजय झोल यांनीही पैसे गुंतवले होते. पण जागतिक मंदी आल्यामुळे अनेकांचे पैसे बुडाले. विजय यांचेही पैसे बुडाल्यामुळे त्यांनी किरण खरात यांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर विजय झोल यांनी गेल्या १० ते १२ दिवसांपासून माझे अपहरण करून कोंडून ठेवल्याचा दावा किरण खरात यांनी केला आहे. आपल्याला ४ तारखेला पुणे येथून जालना येथे आणले आणि माझे घर, जालन्यातील ४ ते ५ प्लॉट्सची रजिस्ट्री बंदुकीचा धाक दाखवून करून घेतल्याचेही किरण खरात यांनी म्हटलं आहे. त्यानंतर या वादात जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी खोतकर यांच्यावर आरोप करताना यामागे खोतकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची माहिती आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पण यामुळे विजय खोल यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रिप्टो करन्सी हा घोटाळा ५०० कोटींचा असल्याचा अंदाज आहे.

विजय झोल हे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई आहेत खोतकर यांची मुलगी दर्शनाबरोबर विजयचा विवाह झाला आहे. तसेच तो जालन्याचे प्रसिद्ध वकील हरिभाऊ झोल यांचा मुलगा आहे. विजयने भारतीय क्रिकेट संघाचे अंडर १९ संघाचे कर्णधारपद भुषवले आहे. दरम्यान अर्जुन खोतकर यांनी आपल्या जावायावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!