Latest Marathi News
Ganesh J GIF

धावत्या स्कुटीवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून गर्लफ्रेंडचे अश्लील चाळे

प्रेमी जोडप्याचा रोमान्स व्हिडिओ व्हायरल, प्रियकर प्रेयसीचा पोलीसांकडुन शोध

लखनऊ दि १८(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रेमी युगुल धावत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओची जोरात चर्चा होताना दिसत आहे.

लखनऊ मधील व्हायरल व्हिडिओत एक मुलगा गाडी चालवत असून त्याची प्रेयसी ही त्या मुलाच्या मांडीवर त्याच्याकडे तोंड करुन बसली आहे. त्याचबरोबर ती अधून-मधून प्रियकराला चुंबन देताना दिसत आहे. तरुणीने आपल्या दोन्ही पाय या मुलाच्या कंबरेभोवती ठेवले आहेत. महत्वाचे म्हणजे  हे अश्लील चाळे सुरु
असताना वाहतुकीचे नियम देखील तोडण्यात आले आहेत.लखनऊच्या रस्त्यावर फिल्मी स्टाइल स्टंटबाजी करतानाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर रोष व्यक्त केला आहे. पण हे दोघे कोण आहेत याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हजरतगंज पोलिसांनी तपास सुरु केला आहे.तर लखनऊ सेंट्रल झोनचे डीसीपी अपर्णा रजत कौशिक तातडीने चौकशी आदेश दिले आहेत.नेटकरी या जोडप्यावर चांगलेच संतापले आहेत. पण चित्रपटसप्रमाणे असे कृत्य सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य केले जात असल्यामुळे अनेकांनी रोष बरोबरच चिंता व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!