
विषारी साप म्हटल की अंगावर शहारे उभे राहतात…एखाद्याला विषारी साप चावला आणि त्याला वेळेत उपचार मिळाले नाही तर त्याचा लगेच मृत्यू होतो. पण सध्या साप चावल्याचं एक विचित्र प्रकरण चर्चेत आलं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाला एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा साप चावला. 15 दिवसांत त्याला तीनदा सापाने दंश केला पण तरी त्याला काहीच झालं नाही. तिन्ही वेळा तो बरा झाला आणि आता एकदम ठणठणीत आहे. बिहारच्या औरंगाबादमधील या अनोख्या प्रकरणाने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिजोई गावात राहणारा 12 वर्षांचा नीरजल्या वारंवार सर्पदंश होत असल्याने त्याचं कुटुंब दहशतीत आहे. त्याचं प्रकरण पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. हे नेमकं कसं शक्य आहे ते त्यांनाही समजेना. हे आश्चर्य!
पाहा नीरजचे आजोबा भगत यांनी सांगितलं, 2 जुलैला त्यांचा नातू नीरजला घराबाहेर विषारी सापाने दंश केला. तो मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून आम्ही त्याच्याजवळ गेलो. तेव्हा त्याला साप चावल्याचं समजलं. त्यानंतर त्याला लगेच सदर हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी उपचार करून त्याला मगध मेडिकल कॉलेजला पाठवलं. उपचारानंतर नीरज बरा झाला, दोन दिवसांनी त्याला घरी आणण्यात आलं. नंतर तो पुन्हा बाहेर खेळत असताना पुन्हा त्याला साप चावला.त्यानंतर घरच्या घरीच त्याच्यावर उपचार करण्यात आले. 13 जुलैला तो घराच्या छतावर झोपला होता तेव्हा तिसऱ्यांदा त्याला साप चावला, तेव्हा तो ओरडला. काही वेळाने बेशुद्ध झाला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं तो पुन्हा बरा झाला. नीरजला साप पुन्हा पुन्हा हा दंश करत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसंच इतक्या वेळा साप चावूनही नीरज बरा होतो, याबाबतही आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.