मुंबई दि १(प्रतिनिधी) – चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात बालिका वधु नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री हंसी परमार विवाहबंधनात अडकली आहे. तिने ग्वाल्हेरमधील आकाश श्रीवास्तवची जीवनसाथी म्हणून निवड केली होती. ग्वाल्हेरमध्ये हा विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
हंसी परमार आणि आकाश श्रीवास्तव यांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात ग्वाल्हेर येथे संपन्न झाला. त्या लग्न सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. जेव्हा हंसी गुजरातमधून महाराष्ट्रात पोहोचली आणि चित्रपट अभिनेत्री बनण्याचा खडतर प्रवास सुरू केला, त्या वेळी ती राहण्यासाठी घर शोधत होती, तेव्हा आकाश ती राहायला गेलेल्या इमारतीच्या जवळ राहत होता. इथेच दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि आता ते जोडीदार बनले आहेत. महाराष्ट्रात तिनं करिअर केलं मात्र लग्नानंतर आता मध्यप्रदेशच्या ग्वालियरची ती सून झाली आहे. नवऱ्याच्या घरी ती कायमची शिफ्ट होणार आहे. महत्वाचे म्हणजे हंसी आणि आकाश यांचा एक अल्बम देखील रिलीज होणार आहे.
हंसी परमार ‘बालिका वधू’, ‘गीत हुई सबसे पराई’, ‘काली’, ‘एक अग्निपरीक्षा’ सारख्या मालिकेत तिनं काम केलं आहे. त्याचप्रमाणे ‘रन बेबी रन’, ‘खिलाडी नं. २०१’, ‘फोर्टी प्लस’, ‘जूनून’, ‘विशुद्ध और काला धनी’, ‘धमाल’ सारख्या सिनेमातही तिनं काम केलं आहे.