Latest Marathi News
Ganesh J GIF

निकालापूर्वीच पुण्यात झळकले सत्यजित तांबेच्या विजयाचे बॅनर

नाशिकच्या निवडणूकीची पुण्यात चर्चा, पहा कोणी, का झळकवले बॅनर

पुणे दि २(प्रतिनिधी)- विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल येण्यासाठी अजून वेळ असला तरी त्याआधीच पुण्यात नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे या बॅनरची चर्चा होत आहे.

निकालापूर्वीच विजयांचे दावे केले जातात त्याचे कोणाला आश्चर्यही वाटत नाही पण नाशिकच्या निकालाच्या बॅनरबाजीला पुण्यात सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांचा विजय झाल्याचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची पाषाण परिसरात सत्यजीत तांबेंच्या विजयाचे फलक लावले आहेत.जीत ‘सत्या’चीच, आमदार सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन..असा आशय असलेले बॅनर सनी निम्हण यांनी लावले आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांचा प्रवास शिवसेना, काँग्रेस, भाजपा असा राहिला आहे. भाजपाने तांबेना अखेरच्या क्षणी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या विजयाचा दावा भाजपाकडुन करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे तांबेंच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे.

मतमोजणीस सुरवात झाली असून सध्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येत आहेत. वैध मते किती निघणार यावरुन या निवडणुकीत विजयाचे गणित बदलणार आहे. त्यामुळे निकाल येण्यास उशीरा होणार आहे पण त्याआधीच पुण्यात बॅनरबाजी दिसून आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!