Latest Marathi News
Ganesh J GIF

कोल्हापूरात हाॅस्पीटलमध्येच पेशंटने संपवली जीवनयात्रा

आत्महत्येचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद, पोलीसांकडुन कारणांचा शोध सुरु

कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- हाॅस्पीटल ही जीवदान देणारी आजच्या काळातील देवालये आहेत. कोरोना काळात हाॅस्पीटल मधील उपचारामुळे अनेकजण बरे झाले. पण कोल्हापूरातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका रूग्णाने हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली.‌याचा व्हिडिओही समोर आला आहे. मिळालेल्या माहिरीनुसार करवीर तालुक्यातील पुलाची शिरोली येथे राहणारे जयसिंग ज्ञानदेव कणसे हे आजारी असल्यामुळे सुर्या हाॅस्पीटलमध्ये दाखल झाले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.मात्र, पहाटेच्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हॉस्पिटल प्रशासनाने याबाबतची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना देताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रूग्णाचा उडी मारल्याचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

 

हाॅस्पीटलमध्येच आत्महत्येचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती. हा प्रसंग घडल्यानंतर परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलीसांनी तपासणी केली असता प्राथमिक स्तरात आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!