म्हणून रागाच्या भरात गावगुंडाचा घरात घुसत महिलेवर हल्ला
हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, हल्ल्यात महिला जखमी, धक्कादायक कारण समोर
नाशिक दि २६(प्रतिनिधी)- आजकाल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गावगुंडाकडून दहशत निर्माण केली जात आहे. नाशिकच्या सिडको परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. यात एक गावगुंडाने महिलेवर हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या हनुमान चौक शॉपिंग सेंटर येथील एका महिलेने आपल्या घराच्या आवारात चिकुची झाडे आहेत. चिकूच्या झाडावरील चिकू तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गावगुंडास महिलेने हटकल्याने त्या गुंडाने घरात घुसून थेट महिलेवर हल्ला केला. महिलेने आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक जमा झाले, त्यामुळे संशयित गावगुंडाने त्या महिलेस धमकावत तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिला गुंडाच्या हल्ल्यात जखमी झालिउ असून महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी या गावगुंडाच्या दहशतीचा धसका घेतला आहे. घरात घुसून एका महिलेवर हल्ला झाल्याने परिसरातील इतर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
नाशिक आणि सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी एका भेळच्या गाड्यावर एकाला मारहाण करण्यात आली होती. त्याचा देखील व्हिडिओ समोर आला होता. स्थानिक नागरिकांनी उपद्रवी टवाळखोरांवर पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पण या हल्ल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.