Latest Marathi News
Ganesh J GIF

शहराची नावे बदलण्यात देशातील ‘हे’ राज्य आघाडीवर

महाराष्ट्रातील इतक्या शहरांची नावे बदलली, नामांतरासाठी येतो इतका खर्च

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलण्यात आली आहेत ओैरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद आता धाराशिव या नावाने ओळखले जाणार आहे. पण आत्तापर्यंत महाराष्ट्रात १८ शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. पण नामांतर म्हणजे फक्त नाव बदलत नाही तर नामांतराच्या प्रक्रियेसाठी खर्च देखील मोठ्या प्रमाणात असतो.

शहराचे नाव बदलण्याचा अधिकार हा तेथिल राज्य सरकारचा अधिकार आहे. लोकप्रतीनिधी अथवा शहरातील लोकांनी मागणी केल्यास मंत्रिमंडळ शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राला पाठवते. केंद्राने मंजूरी दिल्यानंतरच त्या शहराचे नामांतर होते. पण या निर्णयाला न्यायालयात देखील आव्हान देण्यात येऊ शकते. महाराष्ट्रात उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले होते. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण न्यायालयाने ती याचिका निकालात काढल्याने नामांतराचा मार्ग मोकळा झाला होता. देशात आत्तापर्यंत शहरांची नावे बदल्यात आंध्रप्रदेश राज्य आघडीवर आहे. आत्तापर्यंत आंध्र प्रदेश ७६, तमिळनाडू ३१, केरळ २६, महाराष्ट्र १८, कर्नाटक १४, मध्य प्रदेश १३, गुजरात १२, पश्चिम बंगाल ९, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा प्रत्येकी ८, हरियाणा ६, पंजाब आणि राजस्थान प्रत्येकी ४, आसाम आणि गोवा प्रत्येकी ३, ओडीसा, पांडिचेरी, हिमाचल प्रदेश प्रत्येकी २ तर छत्तीसगड, मिझोराम आणि नागालँड या राज्याने प्रत्येकी एका शहराची नावे आतापर्यंत बदलली आहेत.

एखाद्या शहराचे नाव बदलण्यासाठी २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. कारण शहराचे नाव बदलल्यास सरकारी स्टेशनरी मध्ये बदल करावा लागतो. तसेच शहरातील सर्व सार्वजनिक सूचनाफलक रेल्वे, बस स्थानकावरील फलक मार्गावरील फलक बदलण्याचा खर्च करावा लागतो.त्याला मोठ्या प्रमाणात खर्च येतो. एकंदरीत शहराचे नाव बदलणे राजकीय व आर्थिकदृष्ट्या जोखमीचे काम आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!