
फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी
डोंबीवलीत रंगाच्या उत्सवाचा बेरंग,दोन गटातील राडा सीसीटीव्हीत कैद
डोंबिवली दि ७(प्रतिनिधी)- डोबींवलीत आजदे पाडा परिसरात फुगा मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राज्यात सगळीकडे होळीचा उत्साह आहे. पण डोंबीवलीत आजदे पाडा परिसरात एका गटातील तरुणावर दुसऱ्या गटातील तरुणाने मुद्दाम फुगा फेकल्याने या दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीमध्ये झाले. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण सुरू केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. एकंदरीत रंगाच्या उत्सवाचा डोंबिवली आजदे पाडा परिसरात अतिउत्साही तरुणांमुळे रंगाचा बेरंग झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान होळी आणि रंगपंचमीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, दुसऱ्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीने सण साजरा करण्याचा आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.
डोंबिवलीत फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा, घटना सीसीटीव्हीत कैद#HoliFestival #dombivli pic.twitter.com/nI3m32mpOA
— PravinW🇮🇳 (@pravinwakchoure) March 7, 2023
इतर ठिकाणीही वादाच्या घटना घडल्या आहेत. नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात काही मद्यपी युवकांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्रिमूर्ती चौक या अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या परिसरात ही घटना घडली आहे. यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.