Latest Marathi News
Ganesh J GIF

सुलतानी संकटानंतर शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, हातातोंडाशी आलेली पिक मातीमोल

पुणे दि ७(प्रतिनिधी)- होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाने महाराष्ट्राला जोरदार दणका दिला आहे. मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बळीराजाने सुलतानी संकटाशी झुंजत असताना आता अस्मानी संकटानेही हजेरी लावून शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने उदध्वस्त करुन टाकले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात ढगाळ वातावरण असल्याने त्याठिकाणीही शेतकरी चिंतेत आहेत. धुळ्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.आधी कांद्याने रडवल्यानंतर शेतकऱ्यांना आता निसर्गाने दणका दिला आहे. अजूनही हे संकट संपले नसून पाश्चिमात्य वाऱ्यांमुळे अरबी समुद्रावर दाब निर्माण झाला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे सोलापूर व पश्चिम महाराष्ट्रात श्रविजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसासोबत गारपीटीनंही झोडपून काढले आहे. सध्या कांदा, गहू, ज्वारी पिकांची काढणी सुरु असताना अचानक पावसाने हजेरी लावली.अवकाळी पाऊस, गारांमुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली. तर द्राक्ष बागायतदार शेतकरीही प्रचंड धास्तावला आहे. दरम्यान शहरी भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

 

अवकाळी पावसाचं नुकसान पाहता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय त्यांनी या नुकसान भरपाईची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना पंचनामा करुन नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!